Published On : Tue, Apr 6th, 2021

लाईट ऑफ होप फाउंडेशनतर्फे होतकरू विद्यार्थांना टैब वाटप..!

Advertisement

लाईट ऑफ होप फाऊंडेशनतर्फे होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक गरजांकरीता टैब वाटप करण्यात आले. मागील १ ते सव्वा वर्षापासुन कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थांचे शिक्षण हे पुर्णपणे डिजिटल झालेले आहे, असे असतांना सर्व विद्यार्थांना त्याच्या घरूनच डिजिटल पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे.

यामध्ये काही होतकरू विद्यार्थांकडे मोबाईल किंवा टैब नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहत आहे असे जेव्हा लक्षात आले तेव्हा लाईट ऑफ होप फाउंडेशन तर्फे व ६ सेन्स् आय.टी. कंपनी व सोशल मीडिया स्ट्रॅटेजीस्ट अजित पारसे यांच्या मदतीने जवळपास १५ टैब घेऊन होतकरू विद्यार्थांना देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लाईट ऑफ फांउडेशन तर्फे डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे.

या उपक्रमाकरीता लाईट ऑफ होप फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय पाटील, उपाध्यक्ष प्रसाद मुजुमदार, आरती पांडे, चिन्मय खानझोडे, आदित्य वाडेकर, डेविन ऊकेबांते, सागर तिवारी, पद्मज पाटील, शिवानी कर्णिक यांनी परिश्रम घेतले.