Published On : Sat, Jun 5th, 2021

एक व्यक्ती, एक झाड चळवळ वृद्धींगत करुया..! : नागेश सहारे

Advertisement

नागपूर: नागपूर हे देशातील हिरव्या शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. येथील वनराई आणि वृक्षराजी साऱ्यांनाच आकृष्ट करतात. दरम्यान, मागील काही दशकांपासून या शहराचा विकास जोमाने होत आहे. विकासाच्या बाबतीतही नागपूर शहर क्रमांक एक वर आहे. दरम्यान, या विकासासाठी काही वृक्षांना बाजूला केले जात आहे. विकास करायचा असेल तर ते आवश्यकही आहे. मात्र, एका वृक्षाच्या मोबदल्यात अनेक वृक्ष इतरत्र लावण्याचीही भूमिका येथील प्रशासनाची असल्याने विकासामुळे वृक्ष कमी नव्हे तर वाढतच आहे, असे मत मनपाचे माजी क्रीडा समिती सभापती तथा नगरसेवक नागेश सहारे यांनी मांडले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, नागपूरने आता बदलत्या जगाप्रमाणे बदलायला हवे. एक वृक्ष तोडायचे असेल तर ते मुळासोबत काढून त्याचे इतरत्र प्रत्यारोपण करता येईल, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. नागपूर महानगरपालिका अथवा प्रशासनाने या तंत्रज्ञानाचा उपयोग नागपुरात सुरू केला तर विकासालाही गती मिळेल, असे श्री. सहारे यांनी सांगितले.

नागपूरचा भौगोलिक परिसर वाढत आहे. लोकसंख्याही वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची संख्याही वाढणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आता ‘एक व्यक्ती एक झाड’ या संकल्पनेचे चळवळीत रुपांतर व्हायला हवे.

नगरसेवकांनी यासाठी त्यांच्या प्रभागातील लोकांना प्रोत्साहित करून प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले. झाड लावणे सोपे आहे मात्र ते जगवणे कठीण आहे. त्यामुळे झाड लावताना ते जगवण्याचाही संकल्प करावा. जो व्यक्ती किंवा जे कुटुंब वृक्ष लावत असेल त्याच्या मालमत्ता करात काही टक्क्यांनी सूट दिल्यास ह्या चळवळीला बळकटी मिळेल, असेही नगरसेवक नागेश सहारे यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement