Published On : Wed, Jan 15th, 2020

अग्निसुरक्षा अभियानांतर्गत दिले आगीपासून बचावाचे धडे

Advertisement

आष्टीमधील इंस्टिट्युट ऑफ फायर ॲण्ड सेफ्टीमध्ये प्रात्यक्षिक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेया अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत कळमेश्वर तालुक्यातील आष्टी येथील इंस्टिट्युट ऑफ फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आगीपासून बचावाचे धडे देण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी (ता. १४) कार्यकारी सहायक केंद्र अधिकारी केशव केठे यांनी सुमारे १०० विद्यार्थ्यांना अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाची माहिती दिली.

यामध्ये टर्न टेबल लॅडरची प्रात्यक्षिके तसेच विभागातील विविध उपकरणांची माहिती देत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. विभागातील गाड्यांची माहिती देत त्याची प्रात्यक्षिकेसुद्धा दाखविण्यात आली.

संस्थेचे संचालक कुमार अरविंद सिंग, प्राचार्य डॉ. बबिता सिंग, सर्वश्री मनीष, संतोष, त्रिभूषण, प्रवीण,बबन वानखेडे तसेच अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी आर. आर. दुबे, मुख्य मेकॅनिक अनिल बालपांडे, फीटर तानेश पंधरे, प्रमुख अग्निशमन विमोचक जयंत अनिवाल, यंत्र चालक डी.बी. कावळे, प्रमुख अग्निशमन विमोचक आनंद गायधनी, देवानंद शामकुळे, अशोक पोटभरे, शरद वाघमोडे, यंत्रचालक एच.डी. पाटील आदींनी सहकार्य केले.