Published On : Fri, Nov 19th, 2021
By Nagpur Today Nagpur News

Legislative Council Elections : नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर

मुंबई/नागपूर: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी (maharashtra Legislative Council Elections) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली. भाजपनेही (bjp) या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव जाहीर केली आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ (विधानपरिषद) भाजपची चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. आज भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. कोल्हापूरमधून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल, नागपूर मधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार आहे.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपचे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार

१ कोल्हापूर- अमल महाडीक

२ धुळे नंदुरबार- अमरिष पटेल

३ नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे

४ अकोला-वाशीम वसंत खंडेलवाल

५ मुंबई- राजहंस धनंजय सिंह

असा आहे कार्यक्रम

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य सर्वश्री कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे.

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021

नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021

मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021

मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021

आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021

Advertisement
Advertisement