| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 23rd, 2018

  २९ एप्रिल रोजी होणार पट्टे वाटप : कुकरेजा


  नागपूर: शहरातील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम २९ एप्रिल रोजी उत्तर नागपुरातील मार्टिन चर्च परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

  यासंदर्भात आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. २३) स्थायी समिती सभापतींच्या कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, नासुप्रचे विशेष कार्य अधिकारी अजय रामटेके, एनएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर कुळमेथे, मनपाचे कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर उपस्थित होते.

  सदर बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. मालकी हक्क पट्टे वाटपासंदर्भातील संपूर्ण माहिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी घेतली. आमदारद्वयांनीही याबाबत आढावा घेतला. इंदिरा नगर, कस्तुरबा नगर येथील रहिवाशांना मुख्यत्वेकरून या कार्यक्रमात मालकी हक्काचे पट्टे देण्यात येईल. सदर कार्यक्रमाला शहरातील खासदार, आमदार, महापौर व नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145