Published On : Wed, Jun 7th, 2023

जयताळा मुख्य जलवाहिनीवर गळती दुरुस्ती : ७ जून (बुधवारी )रात्री ,१६ तासांचे शट डाऊन

शट डाऊन काम दरम्यान टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही | परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे...

नागपूर : ६०० मी मी व्यासाच्या जयताला जलकुंभ मुख्य जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली आहे . ह्या गळतीला दुरुस्त करण्यासाठी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी १६ तासांचे शट डाऊन दि. ७ जून (बुधवार ) रात्री १० ते (गुरुवार) ८ जून ला दुपारी २ वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे . ह्या तांत्रिक शट डाऊन कामामुळे जयंताला भागाचा पाणीपुरवठा ८ जून (गुरुवार) रोजी बाधित राहणार आहे .

जयंताला जलकुंभ ८ जून (गुरुवार) रोजी बाधित राहणारे भाग : जयताला , एकात्मता नगर, वानखेडे ले आउट, पूजा ले आउट, नितनवरे ले आउट, दिनेश भांगे ले आउट, वूड लँड सोसायटी , दादाजी नगर आणि ठाकरे ले आउट व इतर परिसर

Advertisement

ह्या शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

Advertisement
Advertisement
Advertisement