Published On : Sat, Aug 21st, 2021

ई वाहनांची किंमत आवाक्यात आणण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्नशील

Advertisement

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : इथेनॉल ,मिथेनॉल ‘ बायो -सीएनजी ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून भारतीय बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत सुद्धा कमी करण्याकडे आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात केले .

Advertisement
Advertisement

स्थानिक वर्धा रोड येथील हॉटेल रेडिसन ब्लू येथे जग्वार आय – पेस या संपूर्ण इलेक्ट्रिक स्पोर्ट युटिलिटी वेहिकल्स – एस यू व्ही वाहनाचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये लागणारे सुटे भाग , प्लास्टिक तसेच रबर बनवण्यासाठीचे इंडस्ट्रियल क्लस्टर स्थापन करण्यात येत असून ही या क्षेत्रातील वेंडर्स साठी चांगली संधी आहे. सुट्या पार्टच्या कमी किमती मुळे इलेक्ट्रिक व्हेईकलची किंमत सुद्धा आवाक्यात येणार आहे.

ही वाहने कमी प्रदूषण करतात यासाठी आपण सुद्धा स्वतःच्या इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्राधान्य दिले असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले .याप्रसंगी त्यांनी फित कापून जग्वार या कारचे लोकार्पण केले .याप्रसंगी जग्वार कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते .

https://t.co/SC6p93GUGB

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement