Published On : Mon, Mar 12th, 2018

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या द्वितीय फेरीचा शुभारंभ

Polio
नागपूर: भारत सरकारच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा द्वितीय फेरीचा शुभारंभ काल (ता ११) पासुन सुरू झाला. नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील १९८९७५ बालकांना पोलिओचा डोज पाजण्यात आला.

या मोहिमेचा शुभारंभ सकाळी महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे ओरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. शशीकांत जाधव यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोज पाजून करण्यात आला. यावेळी नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ.संजीव जैस्वाल, नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, सुनील धुरडे, विजय तिवारी, नरेंद्र बहिरवार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ.शशीकांत जाधव म्हणाले, आपल्या बालकांना पोलिओ डोज पाजणे अनिवार्य आहे. शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस बुथ वर नेऊन पोलिओ लस पाजावी. त्याप्रमाणे आज ज्यांचे शक्य झाले नाही त्यांच्या घरी महानगरपालिकेचे कर्मचारी येतील, त्यांना आपण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागपूर शहरातील सर्व दवाखाने, सर्व स्वयंसेवी संस्थेचे दवाखाने, प्रशिक्षणार्थी यांचा या मोहिमेत सहभाग होता. शहरातील सर्व बस स्थानके, रेल्वे स्थानके, टेकडी गणेश मंदिर, स्वामी नारायण मंदिर, विटभट्ट्या, रस्त्यावरील बांधकाम करणा-या मजुरांच्या बालकांना, मंगल कार्यालय या सर्व संस्थांमध्ये असणा-या बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला.

ही मोहिंम महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल चिव्हाने यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. पोलिओ लसीकरण मोहिम अधिकारी सुनील धुरडे, डॉ. विजय जोशी, विजय तिवारी हे मोहिमेवर देखरेख ठेवून होते.

या मोहिमेला मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, नोडल अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, झोनल अधिकारी यांचे सहकार्य लाभले.