Published On : Mon, Jul 9th, 2018

शेषनगर ते गांधीबाग बससेवेचा शुभारंभ

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत आपली बस या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागात सार्वजनिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रविवारी (ता.८) रोजी शेषनगर ते गांधीबाग बससेवेचा शुभारंभ दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर, नगरसेविका मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, मुकुंद डगवार, दामोदर बोबडे, प्रमोद सारंगे, वसंत गणोरकर, नानाभाऊ आदेवार, शुभांगी घ्यार, सुधीर सोनटक्के, रामराव मातकर प्रामुख्याने उपस्थित होते.

शेषनगर ते गांधीबाग ही बस सेवा सुरू करण्यासाठी नागरिकांची वारंवार मागणी येत होती. त्यावर परिवहन समिती बंटी कुकडे आणि परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. ही बस शेषनगरहून सकाळी ९.२० ला सुटेल तर शेवटची बस दुपारी ४.५० ला सुटेल.

गांधीबागहून ही बस सकाळी १०.२० ला सुटेल तर शेवटची बस ५.४० ला सुटेल. ही बस तपस्या शाळा, मानेवाडा चौक, क्रीडा चौक, आयचित मंदिर मार्गे गांधीबाग धावेल. या मार्गाचे पूर्ण तिकीट १३ रूपये आहे तर अर्धे तिकीट सात रूपये आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.