Published On : Sat, May 30th, 2020

चिमणा झरी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

बेला: जवळच्या चिमणा जरी येथील निर्मल जिनिंग अंड प्रेसिंग मध्ये उशिरा का होईना अखेर कापूस खरेदीला शुक्रवार पासून सुरुवात झाली. पालकमंत्री नितीन राऊत क्रीडामंत्री सुनील केदार खासदार कृपाल तुमाने आमदार समीर मेघे माजी मंत्री रमेशचंद्र बंग जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व व जि प सदस्य वृंदा प्रकाश नागपुरे आदी मान्यवरांचे उपस्थितीत कापूस केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनाचे निमित्ताने कापूस केंद्रावर आलेल्या पहिल्या पाच शेतकऱ्यांना अतिथींचे हस्ते गौरविण्यात आले. नितीन राऊत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत ेतकऱ्यांच्या पांढर्‍या सोन्याचा सुपारा तातडीने द्यावा कारण खरिपाची हंगामा करतात त्यांना पैशाची सक्त निकड आहेत याचा अवश्य विचार करावा अशी सूचना वजा विनंती केली सदर कापुस केंद्रास मंजुरी मिळूनही ते सुरू झाले नव्हते त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते या समस्येची दखल क्रीडामंत्री सुनील केदार यांनी घेतली व कापूस खरेदी केंद्र सुरू केले त्याबद्दल शेतकऱ्यांनी केदार यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली.