Published On : Mon, Mar 2nd, 2020

हत्तीरोग दूरीकरण मोहिमेचा शुभारंभ

Advertisement

हत्तीरोग निर्मूलनासाठी मनपाचे अभियान

नागपूर : नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या हत्तीरोग विभागातर्फे हत्तीरोग निर्मूलनाच्या उद्देशाने हत्तीरोग दूरीकरण मोहिमेची सुरुवात झाली. त्याचा शुभारंभ महापौर संदीप जोशी आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या उपस्थितीत गांधीबाग बगीचा येथे झाला.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका श्रद्धा पाठक उपस्थित होत्या. सदर अभियानांतर्गत हत्तीरोग दूरीकरणाकरिता दोन वर्षाखालील बालके आणि गरोदर माता वगळून संपूर्ण शहरात ट्रिपल ड्रग्ज थेरेपी नागरिकांना देण्यात येणार आहे. आयवरमेक्टिन, डी.ई.सी. व अलबेडॅझाल या गोळ्यांचे नागरिकांना सेवन करायचे असून मनपाच्या हत्तीरोग विभागातर्फे वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन या गोळ्या देण्यात येणार आहे. गांधीबाग बगीचा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी या गोळ्यांचे सेवन करून आणि जागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून मोहिमेचा शुभारंभ केला. नागपूर शहरातून हत्तीरोग हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी मनपातर्फे ट्रिपल थेरपीअंतर्गत देण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी आणि आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

याचवेळी अन्य झोनमध्येही विविध पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. उपमहापौर मनीषा कोठे, नेहरूनगर झोन सभापती संमिता चकोले, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, राजेश घोडपागे, महेंद्र धनविजय, संजय बुर्रेवार, नरेंद्र वालदे, नगरसेविका नेहा वाघमारे, सरला नायक, आशा उईके, प्रमिला मंथरानी, सुषमा चौधरी, ममता सहारे, रश्मी उके आदींनी त्यांच्या संबंधित झोनमध्ये आयोजित कार्यक्रमात गोळ्यांचे सेवन करून मोहिमेचा शुभारंभ केला. सोमवार २ मार्चपासून दहाही झोनमधील नागरिकांना गोळ्या देण्यात येणार आहे, या गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement