Published On : Tue, May 5th, 2020

स्व. श्री. मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुऊद्देशीय संस्थेचे वतीने गरजु लोकांना धान्य किट वाटप

स्व. श्री. मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुऊद्देशीय संस्था नागपूर द्वारा श्री. यश मोरेश्वर सातपुते यांच्या तर्फे, संपुर्ण देशात लाॅकडाऊन घोषीत झाल्यापासुन, कोणीच ऊपाशी राहू नये या ऊद्देशाने संस्थेच्या वतीने गरजु लोकांना धान्य किट वितरणाची सुरुवात केली.

गेल्या अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या सेवाकार्यात आज दिं. ०३ मे २०२० रोजी, मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माजी ऊर्जा तथा उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी पालकमंत्री नागपुर , यांची ऊपस्थीती लाभली व साहेबांच्या हस्ते संस्थेतर्फे गरजुंना किट वितरण करण्यात आले.