Published On : Mon, Apr 6th, 2020

स्व. श्री. मोरुभाऊ सातपुते स्मृती बहुऊद्देशीय संस्था नागपुर द्वारा गरजूना धान्य वाटप

दि.२२ मार्च २०२० रोजी केद्र सरकार द्वारा घोषीत झालेल्या लाॅकडाऊन नंतर , स्व. श्री. मोरुभाऊ सातपुते स्मृती बहुऊद्देशीय संस्था नागपुर द्वारा नागपुरात असलेले गरजु लोक ज्यांचा जवळ राशन कार्ड नाही व जे मोल मजुरीचे काम करण्याकरिता आले आहे, अश्या लोकांवर ऊपासमरीची वेळ येऊ नये असे आवाहान मा. देवेन्द्रजी फडणवीस यांनी केल्या नंतर , संस्थेने आवाहनाला प्रतीसाद देत लगेच धान्य वितरणास सुरवात केली.

मिहान मध्ये एका लेबर कॅम्प ला अडकलेल्या ३५० कामगारांना धान्याची व्यवस्था, वंजारी नगर दर्गा जवळ ३० लोकांना धान्य, नारा घाट जवळ १५ लोकांना धान्याची व्यवस्था, युवा शक्ता फाऊंडेशनला धान्याची व्यवस्था तसेच कामगार काॅलनी, सोमलवाडा झेंडा चैक येथील जुनी वस्ती,नवनीत नागर येथे अंध दामपत्य ,धरमपेठ,अश्या अनेक ठिकानी संस्थेच्या माधयमातुन गरजुंना मदतीच कार्य सुरु आहे.


सचिव यश मोरेश्वर सातपुते – 89834 13093