Published On : Thu, Mar 30th, 2017

‘अभय योजने’साठी अखेरचे दोन दिवस

नागपूर: महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘मालमत्ता कर अभय योजना-२००७‘ अंतर्गत थकबाकीचा भरणा करण्यासाठी आता केवळ अखेरचे दोन दिवस उरले आहेत. यात एकमुस्त थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना शास्ती शुल्कात ९० टक्के सूट दिली जात आहे.

आज योजनेच्या १४ व्या दिवशी १६०७६ मालमत्ताधारकांनी आतापर्यंत १४ कोटी ७४ लाख ८१ हजार ४४० रुपये इतकी रक्कम जमा केली. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधून तीन कोटी ९१ लाख १७ हजार, धरमपेठ झोनमधून एक कोटी ३३ लाख ६७ हजार २१६, हनुमाननगर झोनमधून ८७ लाख ६२ हजार ७४८ रुपये, धंतोली झोनमधून ८० लाख ४८ हजार ७३२ रुपये, नेहरूनगर झोनमधून ६१ लाख ५७ हजार ७०७ रुपये, गांधीबाग झोनमधून ८६ लाख ५४ हजार ८०६ रुपये, सतरंजीपुरा झोनमधून ६३ लाख ९६ हजार ३६५ रुपये, लकडगंज झोनमधून १४ लाख ६८ हजार ३१६ रुपये, आसीनगर झोनमधून एक कोटी ९१ लाख ६५ हजार ३२ रुपये आणि मंगळवारी झोनमधून दोन कोटी ३१ लाख ३१ हजार ५१८ रुपये असा कराचा भरणा करण्यात आला. ३१ मार्चला रात्री ८ वाजतापर्यंत रक्कम स्वीकारण्यात येणार असून अधिकाधिक मालमत्ताधारकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement