Published On : Wed, Mar 4th, 2020

बॅगेज स्कॅनरमधून लॅपटॉप बॅग गायब!

– बॅग नेणारा सीसीटिव्हीत कैद, रेल्वे स्थानकावरील घटना

नागपूर: धावपळीत असलेल्या तरूणीने तपासणीसाठी बॅगेज स्कॅनरमध्ये बॅग ठेवली. मात्र, दुसèया बाजुने आलेली बॅग घेण्यास ती विसरली. अन् त्याच वेळी दुसèयाच प्रवासी लॅपटॉप बॅग घेवून निघाला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. हा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर २९ रोजी घडला.

नागपुरातील कोमल सीए ची विद्यार्थीनी आहे. ती बहिणीकडे पुण्याला जात होती. सोबत तीन -चार नातेवाईक होते. त्यांच्याजवळ चार ते पाच बॅग होत्या. त्यांनी संत्रामार्केटच्या दिशेने स्टेशनवर प्रवेश केला. सरकत्या जीण्यावरून ते फूट ओव्हर ब्रिजवर (एफओबी)आले. त्याच ठिकाणी बॅगेच स्कॅनर मशिन आहे. स्टेशनच्या आत प्रवेश करण्यापुर्वी या स्कॅनर मशिनमध्ये सामान तपासणी करावी लागते. स्कॅनर जवळ प्रवाशांची गर्दी होती. तिकडे गाडीची वेळ होत होती.

त्यांनी सर्व बॅग तपासणीसाठी मशिनमध्ये ठेवले. एका बाजुने ठेवलेली बॅग तपासणी करून दुसèया बाजुने निघाल्यानंतर प्रवाशांना ती घ्यावी लागते. मात्र, गाडीची धावपळ आणि बॅगची संख्या अधिक असल्याने कोलम लॅपटॉप असलेली घेने विसरली. हीच संधी साधून दुसèयाच प्रवाशाने कोमलची बॅग घेवून निघून गेला.

दरम्यान सारे जन नागपूर – पुणे एक्स्प्रेसने निघाले. काही वेळानंतर आपली लॅपटॉप बॅग दिसत नसल्याचे कोमलच्या लक्षात आले. तिने सर्वत्र शोध घेतला मात्र, बॅग दिसली नाही. लगेच तिने नागपुरातील घरी नातेवाईकांना सांगितले. काही वेळातच घरचे लोक आरपीएफ ठाण्यात पोहोचले. झालेला प्रकार त्यांनी सांगितला. सीसीटिव्ही नियंत्रण कक्षात फुटेज पाहणी केली असता दुसरा व्यक्ती कोमलची लॅपटॉप बॅग घेवून निघताना दिसला. आरपीएफ जवान त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पुण्यावरून परतल्यानंतर मंगळवारी कोमलने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे.