Published On : Tue, Oct 16th, 2018

देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रामटेक : नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली.नवरात्र उत्सवात गर्भात धम्माल करणार्यांचा जणू ठिकठिकाणी उत्साह बघावयास मिळाला. चिमुकल्यापासून तरुण-तरुणीसह महिलाचा देखील नवरात्र उत्सवात सुंदर वेशभूषा परिधान करून गरब्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स करून गरब्यात धम्माल करणार्यांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. नवीन नवीन स्टेप्स शिकून ह्या गरब्यात ते स्वतःला झोकून देतात. रामटेकला ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देवीच्या मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई आणि मंदिरातील दिव्यांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवरात्रीनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमासोबत गरबा दांडियाची धूम परिसरात बघावयास मिळत आहे. घेण्यात येत असलेल्या रास गरबा उत्सवात आयोजक समाजसेवक गोपी कोलेपरा,राजेश निंबाळकर, ज्योती कोलेपरा यांनी नवरात्रात प्रत्येक दिवशी आकर्षक रोख बक्षिसे ठेवली असल्याने गरबा प्रेमींना सुंदर वेशभूषा परिधान करून अधिक उत्साहाने गरबा उत्सवात भाग घेतला. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तगनाणी दर्शनासाठी गर्दी केली आहे .रोज नऊ दिवस मंदिरात आरतीसह गरब्याच्या आनंद घेण्यासाठी हाऊसफुल गर्दी बघावयास मिळाली.

Advertisement

रंगीत वेशभूषाने सजलेले तरुण, तरुणी, महिला गरबा खेळण्यासाठी व बघण्याऱ्यांची गर्दी बघावयास मिळाली.रास गरबा मध्ये गोपी कोलेपरा ,ज्योती कोलेपरा सह नगरसेवक अलोक मानकर, नगरसेविका लता कामडे ,ग्रामीण पत्रकार संघ चे अध्यक्ष राकेश मर्जीवे यांनी देवीची मनोभावे आरती केली.व गरब्याच्या आनंद घेतला ह्यावेळी बोलो अँबे मात की जय ह्या जयघोष ने व गरब्याच्या गाण्यांनी परिसर दुमदुमला होता .मोहित कक्कड, योगेश शानडीलकर, संजय बोरकर, गौरव वांडरे , अश्विनी कोठेकर, दामिनी जोशी, शीतल पटले, ऐश्वर्या आष्टनकर,वर्षा निंबाळकर, शोभा अडामे आदी आयोजन समिती यशस्वीतेकरिता परिश्रम घेत असल्याचे चित्र दिसले.रामटेक येथे नवरात्र उत्सवात लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह व उमंग दिसून येत आहे. तसे पाहता नवरात्र ते कार्तिक या शहरासाठी उत्साहवर्धक वातावरणाचे प्रतीक आहे.ठिकठिकाणी फुलांचे दुकान सजले आहेत.

महाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे. भाविकांमध्ये पहाटेपासूनच मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जागोजागी गर्दीचे दृश्य दिसून येत आहे. रामटेक येथे वाकाटकालीन हेमाडपंथी माँ. कालंका देवी, पाण्याचा उपसा करून बाहुलीतून निघालेली माँ कुमारिका देवी,एकविरा देवी,हिरव्यागार डोंगरांनी नटलेली माँ बमलेश्वरी देवी, गायत्री देवी,सार्वजनिक बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळ, आदी देवींची उपासना ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement