Published On : Thu, Aug 20th, 2020

कामठी च्या बसस्थानकाहून सहा महिन्या नंतर धावली लालपरी

Advertisement

बसमध्ये 22 प्रवाशांनाच परवानगी

सोशल डिस्टनशिंग चा नियम पाळणार

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी :-कोरोना महामारीच्या काळात शासनातर्फे लॉकडाउनमुळे मागील सहा महिन्यापासून संपूर्ण राज्यासह कामठी तालुक्यात बस सेवा बंद होती परंतु शासनाच्या आदेशान्वये आज 21 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या बससेवेमुळे आजपासून कामठी बस स्थानकावरून लालपरी धावायला लागली .ज्यामुळे प्रवाशीच्या चेहऱ्यावर हास्य उलमगले..

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे 25 मार्च पासून राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सेवा बंद करण्यात आली होती तेव्हापासून कामठी बस स्थानकाहून एस टी बसेस धावल्या नव्हत्या परिणामी कामठी बस स्थानक हे शो पीस ठरले असून या बस स्थानक चौकातील सर्व व्यवसाय मोडकळीस येत या व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते तर प्रवासानि सुद्धा या कामठी बस स्थानक कडे पाठ फिरवली होती मात्र शासनाच्या आदेशानवये आजपासून बस सेवा सुरू होण्याचे फर्मान जारी होताच आज पासून बस सेवा सुरू झाली यानुसार कामठी बस स्थानकावर एम एच 40 बी एल 420 क्रमांकाची रामटेक हुन नागपूर ला जाणारी एस टी बस सकाळी साडे नऊ वाजता येताच नागरिकांच्या वतीने बस चालक एम एल तुरणकर व सहकारी जी के शेंडे यांचा प्रा फिरोज हैदरी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पटेल न्यूज पेपर एजन्सी चे संचालक कृष्णा पटेल, राजेश गजभिये,कोमल लेंढारे, नागसेन गजभिये,प्रदीप साखरकर, इंदलसिंग यादव, ऍड पंकज यादव, शेख सज्जक, देवा कांबळे, अजय करियार,सुनील बडोले, सदभावना ग्रुप चे पदाधिकारी व सदस्यगण, मो अक्रम, सलीम भाई चायवाले, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

-या कामठी बस स्थानकाहून आता नियमित पने नागपूर-मोरभवन-गणेशपेठ, रामटेक, अमरावती, शेगाव, किनवट, कटंगी, माहूर, आकोट, मंडला, मलाजखंड, शिवणी, तुमसर, लोधा, टांगला, कोलीतमारा, टेकाडी, खिडकी, खात, तारसा, कुही, मुसळगाव, मौदा,खापरखेडा,सावनेर या ठिकाणी बसेस धावणार आहेत.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement