Published On : Fri, Sep 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘पालखी निघाली राजाची…’; लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार, भक्तांचा जल्लोष

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
Advertisement

‘पालखी निघाली राजाची…’; लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार, भक्तांचा जल्लोष

मुंबई : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा देखील आज विसर्जनासाठी मार्गस्थ होणार असून, त्यापूर्वी लालबाग परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाच्या निरोपाच्या आरतीपूर्वी स्वरांजली बॅण्डने ‘पालखी निघाली राजाची’ या गाण्याची धून सादर केली. बॅण्डच्या तालावर उपस्थित गणेशभक्तांनी एकच जल्लोष करत ठेका धरला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणाने दुमदुमून गेला.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उत्तरपूजेनंतर दुपारी १२ वाजता लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक सुरू होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता राजा मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निघणार असून, विसर्जनासाठी पुढील प्रवासाला सुरुवात होईल.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement

राजाच्या दर्शनासाठी आणि निरोपाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.