Published On : Sat, Apr 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लक्ष्मी यादव व धनश्री देशपांडे यांनी स्वीकारला झोन सभापतीपदाचा पदभार

Advertisement

नागपूर: भाजपच्या नगरसेविका श्रीमती लक्ष्मी ओमप्रकाश यादव यांनी लक्ष्मीनगरच्या झोन सभापतीपदाचा व श्रीमती धनश्री देशपांडे यांनी धरमपेठ झोन सभापती पदाचा पदभार आज (ता. 24) झोन कार्यालयांमध्ये स्वीकारला. झोन कार्यालयांमध्ये झालेल्या पदग्रहण समारंभात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दोन्ही नवनियुक्त झोन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार श्रीमती माया इवनाते, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, राज्य सफाई कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश डागोर, माजी महापौर श्रीमती नंदा जिचकार, माजी महापौर श्रीमती वसुंधरा मसूरकर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

Gold Rate
Apr 24 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,41,300 /-
Silver/Kg ₹ 2,44,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही दिवसांपूर्वी झोन सभापतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. श्रीमती लक्ष्मी यादव या प्रभाग क्रमांक 16 (ब) या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. भाजपच्या श्रीमती लक्ष्मी ओमप्रकाश यादव यांनी मनपाच्या लक्ष्मीनगर झोन क्रमांक 1 च्या झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात झोन सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी श्री. मुन्ना यादव, नगरसेवक श्री. दिलीप दिवे, माजी नगरसेवक श्री. किशोर वानखेडे, माजी नगरसेवक श्री. रमेश सिंगारे यांच्यासह सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव झोनमधील विविध पक्षांचे नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

त्याचप्रमाणे भाजपच्या श्रीमती धनश्री देशपांडे यांनी आज धरमपेठ झोन क्रमांक 2 च्या झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात झोन सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. त्या प्रभाग क्रमांक 15 (क) या मतदारसंघातून महापालिकेत निवडून आलेल्या आहेत. धरमपेठ झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभाला यावेळी नगरसेविका श्रीमती साधना बरडे, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शनी धवड, मनपाच्या गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती श्रीमती रुतिका मसराम, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक श्री. अभिजीत प्रभूकांत झा, नगरसेवक श्री. विनय दाणी, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे, नगरसेवक श्री. विनोद बघेल, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक यांच्यासह सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement