मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार आले की लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपये वाढवून २१०० रुपये होणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.आता ही रक्कम महिलांच्या खात्यात कधी येणार याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.महिला लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. काही नियम कडक केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. फसवणूक टाळण्यासाठी गरजू महिलांपर्यंत योग्य ती मदत पोहोचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकषांबाहेरील अर्ज स्वीकारल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे अर्ज व कागदपत्रांची पुन्हा एकदा छाननी होणार आहे. डिसेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी चर्चा आहे.
Published On :
Sat, Dec 7th, 2024
By Nagpur Today
लाडकी बहीण योजना, महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
Advertisement