Published On : Tue, Sep 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतचे आजपासून साखळी उपोषण

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न देण्याच्या मागणी
Advertisement

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. मात्र कुणबी-ओबीसी समाजाने यासाठी विरोध केला आहे.

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. समितीने हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार करीत आजपासून नागपुरात साखळी उपोषण करण्याची घोषणा केली. यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र त्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सरकारने लेखी द्यावे, त्यानंतरच हे आंदोलन थांबविण्यावर विचार करू, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान विविध संघटनांचा पाठिंबा आंदोलनाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, भाजपचे माजी जि. प. सदस्य अनिल निदान, अजय बोढारे, माजी सभापती प्रकाश टेकाडे आदींनी भेट दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ, संविधान बचाव कृती समितीचे अरुण वणकर, ॲड, पुरुषोत्तम पाटील, संविधान व लोकशाही बचाव परिषद, जिल्हा वकील संघटनेचे माजी सचिव ॲड. नितीन देशमुख आदींनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.