Published On : Tue, Sep 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आईच्या प्रियकराकडून चार वर्षीय चिमुकलीचा सिगारेटचे चटके देऊन अमानुष छळ !

Advertisement

नागपूर : चार वर्षीय चिमुकलीला आईच्या प्रियकराने सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळाअगोदर पती गमावलेल्या एका महिलेसोबत वडधामना परिसरातच राहतो. त्या महिलेला सहा वर्ष व चार वर्षांचे वय असलेली दोन मुले आहेत.

स्वतःची मुले नसल्याने तो नेहमी त्या मुलांना मारहाण करायचा. तसेच चार वर्षाच्या चिमुकलीचा अमानुष छळ करत त्याने तिच्या सर्वांगाला सिगारेटचे चटके दिल्याची माहिती आहे. यासंदर्भात चिमुकलीच्या आजीला ही कळली असता तिने थेट वाडी पोलिस ठाणे गाठले व आरोपीविरोधात तक्रार केली

पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबविली व संकेतला अटक केली आहे. तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो. तसेच तो लिव्ह इनमध्येच राहत होता, अशी माहिती वाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली. पोलिसांनी संकेतविरोधात अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाअसून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.