Published On : Sat, Jan 5th, 2019

क्रंतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्रियांच्या खऱ्या मुक्तिदात्या – न्यायाधीश माणिक वाघ

Advertisement

नरेंद्र तिड़के महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

रामटेक- ‘अनिष्ठ रूढ़ी परंपरांना विरोध करून समाजसुधारकांनी समाजपरिवर्तन घडवून अाणले.क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी समाजाचा विरोध पत्करुन स्त्री-शिक्षणाची सुरूवात केली. सावित्रीबाई फुले ह्याच स्त्रीयांच्या खऱ्या मुक्तिदात्या आहेत,’ असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांनी केले. ते रामटेक येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ह्याप्रसंगी त्यांनी आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून यथोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष व दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रामटेक चे सहदिवानी न्यायाधीश एम. एस.बनचरे, अॅड.ए.व्ही गजभिये, अॅड.अरविंद कारेमोरे, अॅड. मयुर गुप्ता, प्राचार्य डाॅ.आर.यु.गायकवाड़ आदी मान्यवर उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी श्री नरेंद्र तिडके कॉलेज चे प्राचार्य डाॅ.आर.यु.गायकवाड़ यांनी मार्गदर्शन केले .

अध्यक्षीय भाषणातून दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांनी विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी सदैव सज्ज रहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन प्रा.आशीष पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर तालेवार, पुरुषोत्तम बोरकर, प्रा.सरिता सिंग, प्रा.सुभाष सेलोकर, प्रा.तुलसी वाघमारे, प्रा.गणेश मरठे, अशोक कुचेकर, नागो नाटकर, योगीता घोडमारे, संतोष सयाम यांनी परिश्रम घेतले.