Published On : Wed, Jul 22nd, 2020

तहसील, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय मार्फत रामटेक शहरात कोव्हीड-19 जनजागृती रुटमार्च

जनजीवन के सन्मान मे, कोरोना के विरुद्ध प्रशासन मैदान मे असा दिला नारा .

रामटेक– कोविड योद्धा द्वारे तहसील, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय मार्फत रामटेक शहरात कोव्हीड-19 जनजागृती रुटमार्च काढण्यात आला. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश उजगरे यांनी नागरिकांना संदेश दिला

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की “शहरातील नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. घराबाहेर मास्क शिवाय पडू नये. Social distancing चे पालन करावे. विनाकारण किंवा अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे”

मुख्याधिकारी स्वरूप खारगे म्हणाले की “निरंतर सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे असून नागरिकांनी त्याचा उद्देश समजून घेतला पाहिजे व वेळोवेळी ताप/खोकला/सर्दी/श्वसनाचा त्रास बाबत माहिती तात्काळ नगरपरिषद ला देऊन रुग्णालयात तपासणी केली पाहिजे. अश्याने वेळेवर निदान व वेळेवर उपचार होऊन जीव वाचला जातो व त्यामुळे इतरांना होणारा संसर्ग थांबवता येतो”

पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर म्हणाले की जनजीवन के सन्मान मे, कोरोना के विरुद्ध प्रशासन मैदान मे असा नारा दिला. “मास्क न घातल्यास रु.500/- इतका दंड आकारण्यात येईल. दुकानदारांवर रु.2000/- इतका दंड आकारण्यात येईल., आतापर्यंत जसे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य इथून पुढे नागरिकांनी करावे”