Published On : Sat, Sep 21st, 2019

कोंडापुरवार यांची काँग्रेस महासचिव पदी नियुक्ति

नागपुर: नागपुर शहरातील युवा नेते आलोक कोंडापुरवार यांची नागपुर शहर महासचिव पदी शहर अध्यक्ष श्री विकास ठाकरे यांनी नियुक्ति केली.

आलोक कोंडापुरवार है विद्यार्थी दशेपसुनच काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत.

काँग्रेस विद्यार्थी संघटन (NSUI) च्या मार्फत त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पक्षाच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती NSUI च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी करण्यात आली.

त्यानंतर निरंतर युवक काँग्रेस च्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य सुरु ठेवले. युवक काँग्रेस मधे शहर महासचिव असताना आन्दोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्ना कड़े शासनाचे लक्ष वेधले.

त्यांच्या याच कार्यामुळे व पक्षसंघटनेतील त्याच्या कार्यामुळे नागपुर शहर( जिल्हा) काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कोंडापुरवार यांची नियुक्ति शहर महासचिव पदी केली. या वेळी आलोक कोंडापुरवार यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमेटिचे महासचिव मुकूल वासनिक, ओबीसी आयोगाचे माजी सदस्य दीपक काटोले व शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांचे आभार मानले.