Published On : Thu, Nov 26th, 2020

कोळशाची राख ११६ वाघिणींद्वारे बेंगळुरूला

Advertisement

– मध्य रेल्वे नागपूर विभागाचे यश, ७ हजार ८०० टन राख रवाना

नागपूर: औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून निघालेल्या राखेचे पुढे काय होते, असा प्रश्न जागरुक नागरिकांना पडत असावा. पर्यावरण, आरोग्याच्या दृष्टीने आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणारी ही राख रेल्वेने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वे नागपूर विभागाने पहिल्यांदाच दोन टप्प्यात ११६ वाघिणींमधून (मालगाडी)मदतीने ७ हजार ८०० टन कोळशाची राख बेंगळुरूला पाठविण्यात आली. मध्य रेल्वे नागपूर विभागाचे हे मोठे यश आहे.
राज्यातील १६ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून वर्षाला हजारो टन कोळशाची राख तयार होते. राखेमुळे प्रदूषण वाढते. ही राख नद्यांमध्ये qकवा जमिनीवर टाकली जाते. जमिनीवर टाकलेली राख हवेबरोबर उडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर उपाय म्हणून १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या इमारतीच्या बांधकामात ही राख वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

मध्य रेल्वे नागपूर विभागातील वरोèयात जीएमआर औष्णिक वीज केंद्र आहे. या केंद्रातून निघालेली कोळशाची राख अ‍ॅश टॅक कंपनीने नाममात्र दरात खरेदी करून पहिल्यांदाच मालगाडीने पाठविण्यात आली. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्यासह वाणिज्य अधिकाèयांनी प्रचंड परिश्रम घेतले. चंद्रपूर औष्णिक केंद्रातील राखही मालगाडीने पाठविण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत.

पर्यावरणाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणारी ‘फ्लाय अ‍ॅशङ्क वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथे चालतो. यासोबतच बेंगळुरूतही मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. यामुळे लोकांच्या हाताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काम मिळत आहे. ‘फ्लाय अ‍ॅशङ्कची नेहमीची विट साधारणपणे ९ इंचांची असते, तर लाइट वेट ब्लॉक २ फूट लांबीचे असतात. हे ब्लॉक्स वापरून बांधकाम लवकर होते आणि सिमेंटही तुलनेने कमी लागते. त्यामुळे ‘फ्लाय अ‍ॅशङ्क लोकप्रिय झाले आहेत.

या जगात कुठलीही वस्तू वाया जात नाही. धुळीचाही उपयोग होतो. कोळशाची राख सिमेंटमध्ये मिसळवितात. रस्ते बांधकामात वापरतात. विटा बनविण्यासाठी तसेच कोळसा खाणीतील खड्डे भरण्यासाठीसुद्धा या राखेचा वापर होतो. आतापर्यंत केवळ मातीपासून विटांची निर्मिती होत असे, पण आता प्रथमच कोळशाच्या राखेपासून विटांची निर्मिती होते.

राखेचा वेळीच योग्य वापर
औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठ्याा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे ‘फ्लाय अ‍ॅशङ्क ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानीकारक ठरते. ही राख कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडण्यापूर्वीच ती काही विशिष्ट प्रकारच्या गाळण्यांचा वापर करून साठवली जाते.