Published On : Tue, Oct 30th, 2018

नगरधन येथे कोजागिरी उत्सव सम्पन्न

रामटेक: बहुउद्देशीय परमात्मा एक सेवक मंडळ, नगरधन येथे दि.26/10/2018 रोज शुक्रवारला कोजागिरी निमित्य सार्वजनिक हवन कार्याचे आयोजन श्री श्रावणजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते . हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता पासून सुरु करण्यात आला होता.

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणपतजी चोपकर , नेरला यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राम पंचायत नगरधनचे सरपंच श्री प्रशांत कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नरेशजी धोपटे , माजी प्राचार्य श्री नामदेवरावजी कडूकर आणि गावातील मान्यवर मंडळी व परिसरातील मार्गदर्शक मंडळी या कार्यक्रमात गावातील सर्व सेवक ,सेविका बाळ-गोपाळ उपस्थित होते.

अनेक मार्गदर्शक मंडळींनी व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट विचार , जुनी रूढी प्रथा , बेटी बचाव बेटी पढाव अशा अनेक विचारावरती मार्गदर्शन केले. वाईल्ड चैलेंजर आँगनाईजेशन रामटेक ,सर्पमित्र व प्राणीमित्र गुपचेही यावेळी स्वागत सत्कार करण्यात आले वआणि शेवटी अध्यक्ष मार्गदर्शन झाले.

व या कार्यक्रमाला प्रामुख्याने गावातिल सर्व नवयुवक मंडळींनी रात्री 8 वाजता कला संस्कार थिएटर आर्ट , भंडारा यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता.त्याचा आस्वाद कोजागिरी निमित्ताने उपस्थितांणी घेतला.