Published On : Thu, Jul 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या कोदेगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर, समाजसेवकामुळे वाचले प्राण

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोदेगाव येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर हितज्योती आधार फाउंडेशनचे समाजसेवक हितेश बनसोड यांनी तत्परता दाखवत जखमीला रुग्णालयात दाखल करून मानवतेचे दर्शन घडवले.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंजी येथील जितेंद्र बालचंद खंडाते (वय ३७) हे त्यांच्या एमएच-४०-बीटी-९२६० क्रमांकाच्या दुचाकीने सावनेरकडे जात होते. दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास कोदेगाव येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खापा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, हितज्योती आधार फाउंडेशनचे समाजसेवक हितेश बनसोड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलविण्याचा सल्ला दिला. जखमीसोबत कोणताही नातेवाईक नसल्याने हितेश बनसोड यांनी स्वतः त्यांना नागपूर मेडिकलमध्ये दाखल करून उपचाराची व्यवस्था केली.

Advertisement

या प्रकरणी खापा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.