Published On : Wed, Apr 3rd, 2019

शिवसेना -भाजप-रिपाई -ब.रि.ए.म चे उमेदवार कृपाल तुमाने यांचा वाडी आणि बुटीबोरी क्षेत्राचा प्रचार दौरा

रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेना -भाजप-रिपाई -ब.रि.ए.म चे उमेदवार कृपाल तुमाने यांनी बुधवारी वाडी आणि बुटीबोरी क्षेत्रामध्ये पदयात्रा केली आणि जनतेशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षांमध्ये रामटेक क्षेत्रामध्ये झालेली विकास कामे घेऊन कृपाल तुमाने जनतेसमोर मत मागण्यासाठी जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून जनतेसोबत थेट संवाद ते साधत आहेत.

बुधवारी कृपाल तुमाने यांनी गोधणी, बोखारा,गुंतला,बैलवाडा,भारतवाडा ,ब्राम्हणवाडा, खंडाळा,पारडी,आष्टी ,येरला,फेटरी, चिंचोली,खाडगाव,लावा,दुधधामणा,आठवा मैल,सुराबर्डी,बुटीबोरी शहर,बोथली ले आऊट,खैरी,बोरखेडी रेल्वे या गावांमध्ये प्रचार दौरा केला.

यावेळी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे, भाजप जिल्हा प्रमुख डॉ.राजीव पोतदार, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार,राजेंद्र हरणे , युवा सेना प्रमुख हर्शल काकडे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप माथनकर, शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासाने ,विलास बोंबले,अनिस बावला , संजय मेहर ,आनंद कदम,विनोद सातंगे,सागर कटारे,दिपक शेंदरे,प्रमोद गमे,भूषण बोरकुटे,मधु मानके पाटील,प्रफुल्ल होले,विलास श्रीखंडे,रुपेश झाडे, रुपेश झाडे,मुकेश भोयर,मनोज नाह्ने,अमोल कुरटकर,ईश्वर मोरे,नारंग खोरगडे,विजय राऊत उपस्थित होते.