Published On : Mon, Jul 9th, 2018

शेतकऱ्यांच्या हमीभावाची घोषणा ही केवळ जुमलेबाजी !

Advertisement

नागपूर: अखिल भारतीय किसान सभेने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी शेतमालासाठी जाहीर केलेले हमीभाव हे स्वामिनाथन कॅमेटीच्या शिफारशींची अंमलबजावणी असल्याची केलेली घोषणा ही निव्वळ जुमलबाजी आहे, अशी टीका केली. हमीभावात वाढ करण्यात आली हे योग्य झाले असले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. खाते, बियाणे यांच्या किमतीत झालेल्या वाढीच्या तुलनेत शेतमालाची वाढ ही अतिशय त्रोटक आहे.

भाजप विरोधी पक्षात असतांना त्यांनी कापसासाठी ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल तर धानाला २ हजार रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे भावाची मागणी केली होती, पण आज भाव जाहीर करतांना कापसाला ५ हजार १५० तर धानाला १ हजार ७५० रुपये असा भाव देण्याची घोषणा केली आहे. स्वतःच्या मागणीशी देखील सरकारने साधर्म साधलेला नाही.

स्वामिनाथन कॅमेटीने शेत जमिनीचे भाडे तसेच शेतकरी कुटुंबाची मेहनत विचारात घ्यावी, अशी शिफारस किसान सभेने केली आहे. याचा अर्थ जाहीर केलेले भाव हे स्वामिनाथन कॅमेतूनुसार नाही, तर दुसरीकडे हमीभाव जाहीर केला असला तरी त्या भावाने खरेदी करणारी यंत्रणा सरकारजवळ नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे.तसेच यावर्षी तूरडाळ खरेदी करतांना राज्य सरकारने केलेला सवाल गोंधळ सर्वांनाच माहिती आहे, याकडेही अखिल भारतीय किसान सभेने लक्ष वेधले आहे.