Published On : Wed, Aug 29th, 2018

किरात समाज भुजलियॉ स्नेह मिलन कार्यक्रम थाटात साजरा .

Advertisement

कन्हान : – स्थानिय किरात समाज व्दारे भुजलियॉ स्नेह मिलन कार्यक्रमात १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून उत्कृष्ट भुजलियॉ पुरस्कार वितरण करण्यात येऊन किरात समाज भुजलियॉ स्नेह मिलन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

किरात समाज कन्हान व्दारे सोमवार (दि.२७) ला सायंकाळी ५ वाजता संत तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथुन भुजलियॉसह तारसा रोडने महिला व समाज बांधवानी वाजा गाज्यासह नाचत मिरवणूक काढुन हनुमान मंदिर, इंदिरा नगर कन्हान येथे भुजलियॉचे विसर्जन करण्यात आले .

सायंकाळी ७ वाजता डोणेकर सभागृह येथे किरात समाज भुजलियॉ स्नेह मिलन कार्यक्रम मा. नारदजी दारोडे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी मा. रामजी नेवले समाज सेवक नागपुर, मा. शरदजी डोणेकर उपाध्यक्ष जि. प. नागपुर, मा. अशोकजी झाडे उपाध्यक्ष म.रा.किरात समाज नागपुर,नागपुर, मा. भाऊराव हारोडे, मा.लक्ष्मीबाई गड़े आदीच्या उपस्थितीत सत्कारमुर्ती मा. शेषरावजी गडे व मा. निलकंठजी लुहुरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला.

आणि इयत्ता १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व कु.राखी अन्नाजी लुहुरे च्या वतीने फोल्डर फाईल भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रंगारंग भुजलियाँ प्रथम पुरस्कार ११०० रू.सौ.किरणजी हारोडे, द्वितीय पुरस्कार ७०० रू.सौ. अनुपमा खंडाईत असे एकूण पाच पुरस्कार अनुक्रमे ४००रू. ३००रू. २००रू. देण्यात येऊन सहभागी सर्वच भुजलियाँ ना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

उपस्थित सर्वांनी स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्तविकातुन अशोक खंडाईत यांनी समाजाच्या प्रगती करिता सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले . सुत्रसंचालन श्री नाथ्थुजी नान्होरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दारोडे यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महिला श्रीमती चंपाताई दारोडे, कल्पना गड़े, सीमा लुहरे, आकांशा काठोके , किशोरी काठोके , राधेश्याम हारोडे, नरेश गड़े, मनोहर बादोले, सदानंद हारोडे, उमराव गड़े, केशवराव मोहने, राजेंद्र काठोके, शेषराव गड़े, प्रल्हाद बालकोटे, मोती हारोडे, दिपक गडे , पंचम कारोंडे , विनोद हारोडे , माधोवराव काठोके, मारोतराव खंडाईत, धनपाल हारोडे , प्रेमदास मोहने , सेवकराम लुहुरे , शंकर महादुले, युवराज बरबटे, सियाराम डडुरे , महेश झाडे आदीसह समाज बांधवानी सहकार्य केले .