अनेक थोर महापुरुषाचे तैलचित्र खराब अवस्थेत
नागपुर – प्रभाग क्र.१३ रामनगर हील रोड वरिल अंबाझरी टेकळीच्या परिसरात महानगरपालिका अंतर्गत थोर महापुरुषाचे तैलचित्र (म्युरल) उभारण्यात आले असून त्याची देखरेखचे काम महानगरपालिकेकडे आहे. परंतु आजच्या परिस्थीतीत या तैलचित्राची अत्यंत दैनिय अवस्था असून संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
दुदैवी बाब म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राच्या चष्मा टुटलेल्या अवस्थेत आहे. अनेक थोर महापुरुषाचे तैलचित्र खराब अवस्थेत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री.अमर बागडे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला.
याप्रसंगी वार्ड अध्यक्ष हिरुभाऊ चौधरी, विजय चौरे, हरि नायर, मनिष गेडाम, गुंडडु मसुरकर, गंपु धोटे, मनोज पोतदार, विजय डोंगरे, भारत सावरकर यांनीसुध्दा निषेध केला आणि प्रशासनाने याकडे लक्ष देवून परिसर स्वच्छ सुंदर करण्यात यावा याकडे लक्ष वेधले.









