Published On : Wed, Sep 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात हत्या सत्र सुरूच; प्रेयसीची हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात पुरणाऱ्या प्रियकराला अटक

आज मृतदेह बाहेर काढणार
Advertisement

नागपूर: मानकापूर भागातील तरुणीचा खून करून तिचे शव रामटेकच्या जंगलात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रिया बागडी उर्फ ​​प्रिया गुलक (27) असे मृत तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश केशव वळसाकर (वय 57, रा. न्यू सोमवारपेठ, सक्करदरा निकसी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी महेश आणि प्रिया जवळपास 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर प्रिया महेशवर लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे महेशने प्रियाचा खून करून तिला जंगलात पुरले. बुधवारी प्रियाचा मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया सुमारे 6 वर्षांपासून गोधनी येथील फरास येथे तिच्या कुटुंबापासून वेगळी राहत होती. 16 ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाली.तिचा मोबाईलही बंद होता. प्रियाची आई तिला भेटण्यासाठी मानकापूरला पोहोचली तेव्हा ती गायब असल्याचे कळाले. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी आईने मानकापूर पोलीस स्टेशन येथे प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

याबाबत पोलीस परिमंडळ-2 चे उपायुक्त राहुल माकणे यांनी प्रियाचे लोकेशन शोधण्याचे निर्देश दिले. रामटेक येथील हॉटेलमध्ये तिचे शेवटचे लोकेशन मिळाले.

आईने प्रियकरावर केला संशय व्यक्त –

प्रियाच्या आईने महेश्वर महेशवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी महेशला अटक करून विचारपूस केल्यावर त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले.

महेश दूध पावडर बनवणाऱ्या कंपनीचा व्यवस्थापक होता.प्रिया कंपनीतही काम करत असे. त्यावेळी दोघांचे प्रेम प्रकरण जोडले गेले. जेव्हा प्रियाने महेशवर रामटेकच्या हॉटेलवर दबाव आणला, तेव्हा रात्री त्याने तीच गळा आवळून खून केला.हॉटेलपासून सुमारे3 km कि.मी. अंतरावर प्रियाचा मृतदेह त्याने जंगलात नेला आणि तिथे नेऊन पुरल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement