Published On : Sat, Jan 11th, 2020

खाटीकपूरा येथे खाटीक समाज भवनाचे भूमिपुजन आज

Advertisement

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदार निधीमधून प्रभाग १४ मधील सदर खाटीकपूरा येथे खाटीक समाजभवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या खाटीक समाज भवनाच्या बांधकामाचे शनिवारी (ता.११) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता भूमिपुजन करण्यात येणार आहे.

भूमिपुजन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, विशेष अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर संदीप जोशी भूषवतील.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रकाश गजभिये, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रा.अनिल सोले, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी आमदार सुधाकर देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक सर्वश्री प्रवीण दटके, सुनील अग्रवाल, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेविका शिल्पा धोटे, नगरसेवक प्रमोद कौरती, नगरसेवक कमलेश चौधरी, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक सर्वश्री निशांत गांधी, किशोर जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित राहतील.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येत परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement