Published On : Mon, Aug 19th, 2019

आर्थिक थकबाकीच्या वादातून नगरसेविका पुत्राचे अपहरण ,

Advertisement

अपहरण करणाऱ्या नगरसेवकासह इतर आरोपीवर गुन्हा दाखल

कामठी : कामठी नगर परिषद हद्दीत 16 प्रभागाचा समावेश असून 32 नगरसेवकगण या प्रभागाचे नेतृत्व करतात मात्र बहुतांश नगरसेवक वर्ग हे रस्ता बांधकाम, नाली बांधकाम इतर विकासकामातील बांधकामात पेटी ठेकेदार म्हणून कार्यरत असून अप्रत्यक्षरीत्या लाखो रुपयाची मलिदा लाटत असल्याच्या चर्चेला उधाण आहे यातील एका सिमेंट रस्ता बांधकामातील 2 लक्ष 20 हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारातील थकबाकीचा वाद हा मागील कित्येक महिन्यापासून नगरसेवक व नगरसेविका पुत्रात सुरू असून अत्यंत गरजेवेळी नगरसेवकाने थकबाकीचे असलेले 2 लक्ष 20 हजार रुपयाची मागणी केली असता नगरसेविका पुत्राने समाधान कारक उत्तर न दिल्याने या दोघांतील झालेला शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने नगरसेवकपुत्र नगरसेवकासह संगनमताने इतर मित्रमंडळी ना सोबतीला घेऊन चारचाकी कारने नेताजी चौक रहिवासी नगरसेविकापुत्राच्या घरी हल्ला चढवित बळजबरीने घरात शिरून नगरसेविका पुत्राला घराबाहेर काढून त्याला कार मध्ये बसवून अपहरण केल्याची घटना रात्री साडे बारा वाजता घडली.

यासंदर्भात एका निर्जन स्थळी नेऊन थकबाकी असलेल्या आर्थिक व्ययहाराची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र प्रश्न मार्गी न लागत असल्याने नगरसेविका पुत्राला रागाच्या भरात लाकडी दांडू ने जबर मारहाण करीत जख्मि करून त्याच्या घरी सोडण्यात आले याप्रकरणाची गंभीर दखल घेत नगरसेविका पुत्राने थेट जुनी कामठी पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची आपबीती सांगून अपहरण करून मारझोड करणाऱ्या नगरसेवकपुत्र, नगरसेवक तसेच इतर आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविली असून तक्रार नोंदविनाऱ्या पीडित फिर्यादी नगरसेविका पुत्राचे नाव अजय उर्फ भांजे गोवर्धन वाधवानी वय 32 वर्षे रा नेताजी चौक कामठी असे आहे तर गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपीचे नाव नगरसेवक पुत्र धीरज रघुवीर मेश्राम , नगरसेवक रघुवीर मेश्राम, दर्शन राठोड(गुड्डू), कपिल विनोद शेंडे व इतर 7 ते 8 आरोपी सर्व राहणार जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे.बातमी लिहिस्तोवर आरोपीना अटक करण्यात आले नव्हते.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजय वाधवाणी हे प्रभाग क्र 5 च्या अपक्ष नगरसेविका चंपा वाधवाणी यांचे पुत्र असून कामठी नगर परिषद च्या निधोतून बांधण्यात येणाऱ्या सीमेंट रस्ता बांधकामात पेटी ठेकेदार म्हणून कार्यरत होते या कामातील थकबाकी असलेले 2 लक्ष 20 हजार रुपये चा वाद प्रभाग क्र 3 चे नगरसेवक रघुवीर मेश्राम यांच्याशी मागील कित्येक महिन्यापासून सुरू होता मात्र हा वाद संपूष्टात न आल्याने काल मध्यरात्री झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेल्याने रागाच्या भारात नगरसेवक रघुवीर मेश्राम च्या मुलगा धीरज मेश्राम याने वडील नगरसेवक रघुवीर मेश्राम ला मित्रासह सोबतीला घेऊन कार क्र एम एच 43 व्ही 4083 ने नगरसेविका चंपा वाधवांनो

यांच्या घरात शिरून बळजबरीने हिचा पुत्र अजय वाधवाणी बाहेर काढून कार मध्ये बसवून अपहरण करीत पळ काढला या घटनेची माहिती हवेसारखो पसरताच चर्चेचा विषय ठरला त्यात आरोपीनि या जख्मि नगरसेविका पुत्राला एका निर्जन स्थळी नेऊन जबर मारझोड केली तसेच याच्या हाताच्या बोटातील असलेली 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व नगदी 500 रुपये हिसकावून त्याच्या घरी सुरक्षित सोडले यावर पीडित नगरसेविका पुत्राने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारींवरून नगरसेवक रघुवीर मेश्राम, धीरज रघुवीर मेश्राम दर्शन राठोड,कपिल विनोद शेंडे व इतर सात ते आठ सर्व रा जुनी खलाशी लाईन कामठी विरुद्ध भादवी कलम 364(अ),34अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.