Published On : Sat, May 14th, 2022

खासदार क्रीडा महोत्सव २०२२: सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांंतर्गत सॉफ्टबॉल स्पर्धेचे शनिवारी (१४ मे) उद्घाटन झाले. अखिल भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष नितल नारंग व खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला.

यावेळी नागपूर सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख, वैद्यकीय प्रमुख रितेश गावंडे, माजी नगरसेविका संगीता गि-हे, समन्वयक दीपक गि-हे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, डॉ. विवेक शाहु, प्रवीण मानवटकर, राजेश भट्ट, रोशन चौधरी, डॉ. दर्शना येवतीकर, निखील मोधने, निखील वाहने, विनोद सुरकुसे, योगेश बंग, प्रशांत डहाके, सनी राऊत आदी उपस्थित होते.

Advertisement

खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत १४ ते १६ मे दरम्यान मानकापूर येथे सॉफ्टबॉल स्पधा होणार आहे. पुरुष, महिला यासह १७ आणि १४ वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. विजेत्यांना एकूण ३६० पदकांनी गौरविण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य असे प्रत्येकी १२० एकूण ३६० पदक प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरुष आणि महिला गटातून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-या खेळाडूंना प्रत्येकी २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये आणि तिसरे स्थान प्राप्त करणा-यांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय पुरुष आणि महिला गटात बेस्ट प्लेअर खुला गट, पिचर, कॅचर साठी प्रत्येकी १ हजार रुपये पुरस्कार दिले जातील.

१७ वर्षाखालील आणि १४ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटातून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी ११ हजार रुपये आणि तिसरे स्थान प्राप्त करणाऱ्यांना प्रत्येकी ७ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय मुले आणि मुलींच्या गटात बेस्ट प्लेअर खुला गट, पिचर, कॅचर साठी प्रत्येकी १ हजार रुपये पुरस्कार दिले जातील.

स्पर्धेच्या आयोजनासाठी सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर देशमुख, सचिव सुरज येवतीकर, संयोजक सतीश वडे (९०९६५९७०००), दर्शना पंडित, दीपक गि-हे, विवेक साहू, केतन ठाकरे, विनोद सुरकुसे, निखील वाहने, योगेश बंग, प्रशांत डहाके, सुषमा अंबुलकर आदींचे सहकार्य लाभत आहे.

Todays result

Jawaharlal neharu highSchool Savner
1 aryan Dhote
2Sourav Wankhede
3Pranay Ghogal
Saavner 7 run
Pandiy bacchraj nagpur 0 run

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement