Published On : Wed, Oct 6th, 2021

खापा वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा

– १५ हुन अधिक गावात वनविभागाने केली जनजागृती

Advertisement

नागपूर : राज्यात वन क्षेत्र कमी प्रमाणात आहे. हे खरे असले तरी वाढते वनीकरण आणि जंगल तोंडावर लावलेली लगाम यामुळे विदर्भात वन क्षेत्र वाढत आहे. विदर्भ वनसंपदेने नटलेले आहे. जंगल आणि जंगलातील प्राणी जगावे यासाठी दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो याचाच एक भाग म्हणून खापा वनपरिक्षेत्रातील जवळपास १५ हुन अधिक गावात जजागृती पार कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Advertisement

वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमांना क्षेत्र सहायक पी.आर. मडके यांच्या उपस्थितीत खुबाडा येथून सुरुवात झाली. सावनेर, खापरखेडा येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता व विदर्भ खुले निवारा गृहाचे अधीक्षक चंद्रशेखर गजभिये यांनी साप तसेच वन्यजीव यावर मार्गदर्शन केले. यावेळी वनरक्षक स्वप्निल डोंगरे, दादू गणवीर, सर्पमित्र मयूर कनोजे, आनंद शेळके, राहुल मरस्कोल्हे, सावनेर सर्पमित्र अजय पटेल उपस्थित होते.

Advertisement

यानंतर वडेगाव, टेम्भूर्डा, महारकुंड, कोची, खडूका, रिसाडा, उमरी, हिंगणा, खैरी (पं ), कोथूळणा आदी गावांमध्ये वन्यजीव व मानव संघर्षाबद्दल क्षेत्रसहायक मडके यांनी मार्गदर्शन केले तसेच वनविभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी वनरक्षक (आरा गिरणी, खापा) स्वप्निल डोंगरे, ए.बी. बाहेकार, वाय.बी गावतुरे, वनमजूर राजू मसराम, वनमजूर अनिल साखरे, कोथूळणाचे सरपंच हरीश चौधरी, सचिव धर्मेंद्र बन्सोड, उपरपंच चंद्रभान कावळे, माजी उपसरपंच प्रशांत केवटे आदी उपस्थित होते. नागलवाडी, सिरोनी, टेसडी, बिनवा, सोनापूर येथे वनपाल संजय कटरे यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement