Published On : Tue, Apr 17th, 2018

२० एप्रिलला सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचा प्रबोधन कार्यक्रम


नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले जयंती समारोहांतर्गत नागपूर महानगरपालिका व अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सप्तखंजेरीवादक महाराष्ट्र भूषण श्री. सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन्स मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा राहतील. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, राकाँ पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती नागेश सहारे, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित राहतील.

याप्रसंगी सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज आणि मनपाच्या सेवेतून निवृत्त झालेले माजी अपर आयुक्त एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड. सिद्दिकी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमानंतर मैत्री भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे सदस्य राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, अशोक कोल्हटकर, इंजि. कल्पना मेश्राम, विशाल सेवारे, संजय बागडे, राजेश वासनिक, नंदकिशोर भोवते, शशिकांत आदमने, सुषमा नायडू, डोमाजी भडंग आदी कर्मचाऱ्यांनी केले आहे.