Published On : Fri, Aug 9th, 2019

खंडाळा (घटाटे) येथे उज्वला गँस सिलेंडर चे वाटप

कन्हान : – पंतप्रधान उज्वला गँस योजने अंतर्गत ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) येथे गावातील लाभार्थी महिलां ना कोठारी गँस एजन्सी व्दारे उज्वला गँस सिलेंडर चे वाटप करण्यात आले.

ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) कार्यालयात पंतप्रधान उज्वला गँस योजने अंतर्गत कोठारी गँस एजन्सी कामठी व्दारे माजी नगराध्यक्षा अँड आशाताई पनीकर यांच्या अध्यक्षेत व खंडाळा सरपंच रविंद्र केने, अन्न पुरवठा निरीक्षक पारशिवनी त्रितीक्षा बारापात्रे मँडम यांच्या हस्ते गावातील लाभार्थी महिलांना उज्वला गँस सिंलेडर चे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) उपसरपंच राजेश आपुरकर, माजी सरपंच व ग्रा प सदस्य महादेव गांवडे, सदस्या वनिता ताई उके, पायलताई पानतावणे, अर्चना ताई नागपुरे, माधुरीताई साबळे, मनिषा ताई हटवार, ज्योतीताई पाटील, तंटा मुक्ती गाव अध्यक्ष नवरंगजी वानखेडे, सामाजिक कार्यकर्ता विलास चौधरी, अरविंद शेंडे, देवा तेलोते, गोपाल राऊत सह गावकरी व लाभार्थी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सरपंच रविंद्र केने हयानी तर आभार उपसरपंच राजेश आपुरकर हयानी मानले.