Published On : Fri, Feb 12th, 2021

खामला (पांडे ले आउट)जलकुंभ स्वच्छता १३ फेब्रुवारी रोजी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर झोनमधील सर्व जलकुंभ स्वच्छता ११ फेब्रुवारी ते २६ शुक्रवार दरम्यान स्वच्छ करण्याचे ठरविले आहे.

यांतर्गत खामला (पांडे लेआऊट) जलकुंभ १३ फेब्रुवारी (शनिवार), लक्ष्मी नगर नवे जलकुंभ १५ फेब्रुवारी (सोमवार), लक्ष्मी नगर जुने जलकुंभ १७ फेब्रुवारी (बुधवार), टाकळी सीम जलकुंभ व टाकळी सीम संप (हिंगणा टी-पॉइंट) २० फेब्रुवारी (शुक्रवार), प्रताप नगर जलकुंभ २२ फेब्रुवारी (सोमवार), त्रिमूर्ती नगर नवे जलकुंभ २४ फेब्रुवारी (बुधवार) व जयताळा संप २६ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

खामला (पांडे लेआऊट) १३ फेब्रुवारी (शनिवार): पावनभूमी, उज्वल नगर, जयप्रकाश नगर, पंचदीप नगर, राजीव नगर, सीता नगर, राहुल नगर, सावित्री नगर, तपोवन कॉम्प्लेक्स, सोमलवाडा, कर्वे नगर, पांडे लेआऊट, जुने व नवे स्नेह नगर, गावंडे लेआऊट, सेन्ट्रल एक्साईज कॉलोनी, मालवीय नगर, योगक्षेम लेआऊट, लहरी कृपा, गांगुली लेआऊट, अभिनव कॉलोनी, पर्यावरण नगर, नरकेसरी लेआऊट, मेहर बाबा कॉलोनी, छत्रपती नगर, भाग्योदय सोसायटी, नागभूमी लेआऊट, डॉक्टर कॉलोनी

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.