Advertisement
नागपूर : भारतातील अस्पृश्यता, बालविवाह, हुंडा प्रथा, अंधश्रद्धा या सारख्या अनिष्ट प्रथांना विरोध करणारे ज्येष्ठ समाजसुधारक, पत्रकार आणि संयुक्त चळवळीतील पुढारी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर १९७३) यांची जयंती आज शनिवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.
‘नामप्रविप्रा’च्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘नासुप्र’मध्ये आस्थापना अधिकारी श्री. विजय पाटील, सहाय्यक अभियंता श्रीमती झोडे आणि वरिष्ठ लिपिक श्री. बुरले तसेच ‘नासुप्र’ व ‘नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.