| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 30th, 2018

  १ जूनपासून पेट्रोल-डिझेलवरील कर होणार रद्द : केरळ सरकार

  Petrol Price

  File Pic

  नवी दिल्ली: केरळ सरकारने १ जूनपासून पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला कर न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर एक रुपयांचे कमी होणार आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कर हटविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर उद्यापासून लागू करण्यात येणार आहेत.अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली.

  केरळमध्ये सध्या पेट्रोलवर ३२. ०२ टक्के कर आकारण्यात येतो, तर डिझेलवर २५. ५८ टक्के कर लावला जातो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर 1 टक्का सेस सुद्धा आकारण्यात येतो. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या करपासून राज्य सरकारला ७७९५ कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे.

  सध्या केरळमध्ये पेट्रोलचा दर ८२.६१ रुपये असून, डिझेलचा दर ७५.१९ रुपये आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल जवळपास २० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र राज्य सरकारने यासंबंधी अधिकृत माहिती दिलेली नाही.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145