Published On : Wed, Nov 20th, 2019

रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथे 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शन

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) यांच्या वतीने रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथील स्टॉल नंबर D79 व D81 मध्ये 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या मल्टीमिडिया प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रद्यान जसे मोठ्या एलईडी स्क्रिन, एलडीई पैनल, प्लाज्मा टीवी, आभासी वास्तविकता, वर्धित वास्तविकता, सेल्फी कॉर्नर, फ्लिप बुक, टीवी वर गेम्स सह ग्रामीण जीवन पद्धतिची सेटअप च्या माध्यमातून कृषी व ग्रामीण क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजनांवर माहिती मिळणार आहे. ही चित्रप्रदर्शनी दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधित सकाळी 10 ते संध्या. 07 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य चालू राहणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 22 नोव्हेंबर 2019 (शुक्रवार) रोजी दुपारी 3.00 वाजता होईल.

या कार्यक्रमास उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नागपुर तर्फे करण्यात आले आहे.