Published On : Sat, Jun 22nd, 2019

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकद्वारा आंतरराष्ट्रिय योग दिन साजरा

सुद्रुढ आरोग्यासाठी नियमित योगसाधना करा -कुलगुरू प्रो .श्रीनिवास वरखेडी यांचे प्रतिपादन

रामटेक : आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हें आपल्याच हातात आहे त्यामुळे सुढ्रुढ आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित योगसाधना करावी असे आवाहन कुलगुरू प्रो .श्रीनिवास वरखेडी यांनी केले जागतिक योग दीन संस्कृत विश्‍वविद्यालय परिसर रामटेक येथे 21 जुन ला पार पडला.ह्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यांनी मोला सल्ला दिला .

योग साधने विषयी बोलतांना पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी ” नियमित योग केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते .आपले आरोग्य चांगले राहते .योग हे केवळ इतरांना दाखवायचे प्रात्यक्षिक नसून तो सुढ्रुढ आरोग्याचा ठेवा आहे .असे मत हयाप्रसंगी केले

ह्यावेळी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे , पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांची,गट शिक्षणाधिकारी संगीता तभाने प्रामुख्याने उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संयोजक डॉ. मधुसूदन पेन्ना, समन्वयक डॉ. कलापिनी अगस्ती, कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होते.

शुभम जांभुळकर याने सादर केलेल्या योगगीतानंतर रामटेक येथील पतंजली योग समितीचे राजकुमार गायकवाड यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करवून घेतले. यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, तसेच व विद्यापीठाच्या योगशास्त्राच्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांच्या चमूने श्रीशंकराचार्यांच्या निर्वाणषट्कावर तसेच अन्य स्तोत्रांवर योग नृत्य सादर केले. त्याला उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देवून कौतुक केले. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेत झालेल्या योग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेली प्रियंका वैरागडे, दीपिका पाटील, प्रिया टेम्भरे , अभिलाषा सिसोदिया, पूजा देशपांडे व ओषा देशपांडे या माता पुत्री तसेच अन्य विद्यार्थिनींचा समावेश होता.


आभार डॉ. पराग जोशी यांनी मानले.या योग साधनेला विद्यापीठातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर सहकारी तसेच शाळांचे प्राचार्या शिक्षक ,विद्यार्थी तसेच आदी विविध संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.