– ओबीसींच्या वाटेला एकूण ६ जागा
काटोल -काटोल नगर परिषदेच्या 12 प्रभागातील 25 जागेकरिता गुरुवारला 22 जुलै च्या आदेशानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली ओबीसी आरक्षनानुसार ही सोडत करण्यात आली. एकूण २५ पैकी १३ जागा महिलांकरिता आरक्षित झाल्या तर १२ जागा पुरुषांच्या वाटेला आल्या आहे यात ६ जागेवर ओबीसींना आरक्षण जाहीर झाले तर अनुसूचित जातींसाठी 4 व अनुसूचित जमातींसाठी 2 जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. नगर परिषद सभागृहात आरक्षण सोडतीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाअधिकारी (पुनर्वसन) शिवाराज पडोळे,मुख्याधिकारी तथा प्रशासक धनंजय बोरीकर आदी उपस्थित होते.
प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर सदस्यांच्या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहणार्यांना गुरवारला आरक्षण सोडती नंतर एकदाची मुक्क्त्ता मिळाली आहे आरक्षण सोडतीनंतर कही ख़ुशी तर कही गम चि स्थिती निर्माण झाली तर काहीं करिता महिलांना आता मैदानात उतरविण्याच्या वेळ आली आहे.आरक्षण सोडत जाहीर होताच इच्छुक असणारे आपल जमताच कामाला लागले आहे.ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने प्रभार क्र. १ (ब), ७ (अ) व ८ (अ) मध्ये पुरष ओबीसींना तर प्रभाग क्र. ४ (अ), 10 (अ) आणि १२ (ब) मध्ये महिला ओबीसीं उभे राहण्याची संधी मिळणार आहे.