Published On : Fri, Nov 30th, 2018

केरडी ला केंद्र क्रिडा स्पर्धाचे उदघाटन

कन्हान : – पचायत समिती पारशिवनी अंतर्गत साटक केंद्र क्रिडा स्पर्धाचे जि प उच्च प्राथमिक शाळा केरडी येथे थाटात उदघाटन करण्यात आले .

गुरुवार (दि.२९) ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केरडी येथे साटक केंद्र क्रिडा स्पर्धाचे मा चंद्रभानजी वानखेडे अध्यक्ष शा.व्य. समिती यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी मा प्रकाश पडोळे सरपंच केरडी, मा लक्ष्मण खंडाळ उपसरपंच, मा रत्नमाला वानखेडे नव निर्वाचित सरपंचा , कैलासजी खंडाळ, प्रकाश खंडाळ, प्रकाश काठोके , देवाजी भोयर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मा दयारामजी भोयर उपाध्यक्ष कुस्तीगीर संघ नागपुर यांच्या हस्ते क्रिडा ध्वजारोहण करून दोन दिवसीय क्रिडा स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले . यात साटक केंद्रातील १२ शाळेच्या चंमुनी सहभाग घेतला आहे .

Advertisement

उपस्थितीत मान्यवरांचे पुष्पगुच्छ व नुत्य सादर करून स्वागत करण्यात आले . श्री पनवेलकर सरांनी खेडाळु , पंच शिक्षक व शिक्षिका सह शपथ घेऊन दर्शनी सामना जि प उच्च प्राथ शाळा बनपुरी व जि प उच्च प्राथ शाळा बोरी यांचा घेऊन केंद्र क्रिडा स्पर्धाची थाटात सुरूवात करण्यात आली .

कार्यक्रमाचे केंद्र प्रमुख बेले सर यांनी प्रास्तविकातुन खेळाचे महत्त्व सांगितले . सुत्रसंचालन मुख्याध्यापिका प्रतिभा माथुरकर हयानी तर आभार प्रदर्शन श्री चौधरी सर यांनी व्यकत केले . दोन दिवसीय केंद्र क्रिडा स्पर्धाच्या यशस्वीते करिता साटक केंद्रातील सर्व विद्यार्थी खेडाळु , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका परिश्रम घेत आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement