Published On : Wed, Sep 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कपिलनगरमध्ये मारहाणीचे आरोप; दोन दिवसांनंतरही गुन्हा दाखल नसल्याचा तक्रारदाराचा दावा

Advertisement

कपिलनगरमध्ये मारहाणीचे आरोप; दोन दिवसांनंतरही गुन्हा दाखल नसल्याचा तक्रारदाराचा दावा

नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण, जातिवाचक शिवीगाळ, गळा दाबणे, जीवे मारण्याची धमकी आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अनिकेत गणवीर यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, घटनेला दोन दिवस उलटूनही प्रथम माहिती अहवाल दाखल झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तक्रारदार अनिकेत गणवीर यांच्या आरोपानुसार, काही व्यक्तींनी त्यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी जातिवाचक शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर मारहाण करण्यात आली तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गणवीर यांनी तक्रारीत नमूद केल्याचे सांगितले आहे.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय, संबंधित व्यक्तींनी धमकी देत जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेत संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच घटनेत नेमका प्रकार काय घडला, हे स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराची वैद्यकीय तपासणी करावी आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण तपासावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

मात्र, घटना घडून दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याचा दावा तक्रारदाराने केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात तक्रारीतील आरोपांची सत्यता, उपलब्ध पुरावे आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास केला जाणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोप अद्याप तपासाधीन असून, पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.