Published On : Wed, Mar 17th, 2021

नागपुरात कांशीराम जयंती संपन्न

बहुजन नायक मा साहेब कांशीरामजी ह्यांची 87 वी जयंती आज दक्षीण नागपुर बसपा च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश बसपा चे कार्यालयीन सचिव व प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे व नागपुर जिल्हा प्रभारी नागोराव जयकर ह्यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.

बसपा च्या दोन्ही नेत्यांनी तथागत बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजी ह्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केल्यावर केक कापला. बसपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना केक चारुन, कांशीरामजींच्या नावांचा जयघोष करुन, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकून जयंती साजरी केली.

या प्रसंगी नागपूर जिल्हा सचिव महिपाल सांगोळे, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष नितीन वंजारी, महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, वंदनाताई कडबे, संजय सोमकूवर धनराज हाडके, जितेंद्र पाटील, अमन गवळी, शंकर थुल, संभाजी लोखंडे, विलास मून, अनिल मेश्राम, उमेश वासनिक, रवी पाटील, निरंजन जांभूळे, समीर खोब्रागडे, मनोज हुमने प्रामुख्याने उपस्थित होते.