कन्हान : – भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांचा जयंती दिन १५ ऑक्टोम्बर हा ” हॉकर्स डे ” म्हणून कन्हान ला साजरा करण्यात आला .कन्हान येथील वृत्तपत्र वाटप संघाने नगर परिषेद कन्हान-पिपरी येथे सकाळी ७ वाजता डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून हॉकर्स डे कार्यक्रमाची सुरूवात केली .
याप्रसंगी आपले आयुष वृत्तपत्र वाटप करण्यात घालविणारे मा.पृथ्वीराज वासे यांचा पत्रकार एन एस मालविय, संजय सत्येकार, दिंगाबर हारगुडे यांच्या हस्ते शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला .
५ पैसे ते ५ रुपये किमतीचे वृत्तपत्र वाटप करतांना किती समस्या आल्या कधी पायी कधी सायकलवर कुठली ही सुट्टी न घेता सकाळी ५ वाजता हाजरी लावून वृत्तपत्र वाटप केले. नागरिकांनी एखाद दिवसी उशिर झाला की तक्रारी केल्या, बिकट परिस्थितीत सर्वांनी एकमेकांशी सहकार्य केले, तर आता या कामात काहीच नफा होत नसला तरी आपण या कामाला छोटे न समझता निस्वार्थ करत राहणार असे मनोगत वासे यांनी व्यकत केले .
कार्यक्रमास सुतेश मारबते, श्रीधर केशेट्टी, पृथ्वीराज वासे, नरेश बिसने, मोहित वतेकर, राजु गायधने, प्रशांत गणोरकर, प्रमोद बांते, लंकेश महंतो, कोइत मारबते, यस डोंगरे, वंश टोहने, सोनू मानकर, सूरज पाल, अनिकेत डोंगरे, आलोक सूरज चलपे, विवेक पाटिल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.