Published On : Tue, Aug 22nd, 2017

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र : नागरिकही म्हणतात पाणी पिण्यायोग्यच, काही त्रास नाही

Advertisement

WTP
नागपूर: अखेर नागपूर शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कन्हान नदी, अंबाझरी तलाव आणि गोरेवाडा तलावाची पातळी वाढलेली आहे. पावसामुळे कन्हान नदीचे पात्र भरले आहे. कन्हान नदीचा हिरवेपणा जाऊन तिला नवा तपकिरी रंग (मातीचा) आलेला आहे. पाण्याची इनलेट टर्बिडिटी ५००NTU इतकी आहे.

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथील शुद्धीकरण प्रक्रिया आता पूर्णपणे नियंत्रणात असून आऊटलेट टर्बिडिटी नगण्य आहे.

पाऊस पुढील ३ ते ४ दिवस असाच पडत राहिल्यास नदीचा प्रवाह पूर्ववत होऊन परिस्थिती लवकरच सुरळीत होईल आणि उत्तर, दक्षिण व पूर्व नागपूरच्या नागरिकांच्या नळांना स्वच्छ पाणी येऊ लागेल.

दरम्यान वरिष्ठ पत्रकार संजय देशमुख ह्यांच्या घरी गेल्या ३-४ दिवसांपासून पाणी पांढरट किंवा पिवळसर येत होते त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “पाणी थोडे गढूळ येत आहे. पण घरात कुणाच्या प्रकृतीला यामुळे त्रास झालेला नाही. मात्र सावधगिरी म्हणून आम्ही स्वत: तुरटीचा वापर करून तसेच उकळून थंड करून या पाण्याचा वापर करत आहोत.”

अश्याच काही प्रतिक्रिया उत्तर, दक्षिण आणि पूर्व नागपुरातील बर्याच नागरिकांनी दिल्या. जेथे गेल्या अनेक दिवसांत पाऊस न पडल्याने कन्हान नदीच्या कच्च्या पाण्याची गुणवत्ता बदलली असून यामुळे हिरवट रंग पाण्याला आलेला आहे. यामुळे नागरिकांना मिळणारे पाणीही पांढरट दिसून येत आहे.

यासंदर्भात नीरीच्या तज्ञांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला, जलकुंभांना तसेच नागरिकांच्या घरांनाही भेटी दिल्या. यावेळी गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल लवकरच हाती येईल. तरी, प्रथमदर्शी, पाणी पिण्यायोग्य असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.